ताजे
श्री. बाबाजी इंदोरे — नवी मुंबई महानगरपालिका उपमहापौर — जनतेच्या सेवेत सदैव तत्परतक्रार / सूचना साठी संपर्क: +91 95940 20718सदस्यता नोंदणीसाठी आजच अर्ज कराश्री. बाबाजी इंदोरे — नवी मुंबई महानगरपालिका उपमहापौर — जनतेच्या सेवेत सदैव तत्परतक्रार / सूचना साठी संपर्क: +91 95940 20718सदस्यता नोंदणीसाठी आजच अर्ज करा

बाबाजी महादेव इंदोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन... शेकडो नागरिकांनी घेतला लाभ!

बाबाजी महादेव इंदोरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन... शेकडो नागरिकांनी घेतला लाभ!
आरोग्य 🗓️ 16 डिसेंबर 2025 📍 सानपाडा

कार्यसम्राट विभाग प्रमुख श्री. बाबाजी महादेव इंदोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, शिवसंघर्ष प्रतिष्ठान पुरस्कृत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विविध आजारांची मोफत तपासणी करून रुग्णांना योग्य वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले.

या समाजोपयोगी उपक्रमासाठी एमपीसीटी हॉस्पिटल (MPCT Hospital) आणि न्यू मिलेनियम हॉस्पिटल (New Millennium Hospital) यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रभागातील शेकडो गरजू नागरिकांनी आणि रुग्णांनी या शिबिराचा प्रत्यक्ष लाभ घेतला.

सोहळ्याला लाभलेली प्रमुख उपस्थिती: याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील साहेब, उपजिल्हाप्रमुख सुनील गव्हाणे, शहरप्रमुख विशाल ससाणे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश आम्ले, ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी, प्रभागातील असंख्य नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव ठेवून हा वाढदिवस ‘सेवा दिन’ म्हणून साजरा केल्याबद्दल बाबाजी इंदोरे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

📸 फोटो

← सर्व उपक्रम पहा