ताजे
श्री. बाबाजी इंदोरे — नवी मुंबई महानगरपालिका उपमहापौर — जनतेच्या सेवेत सदैव तत्परतक्रार / सूचना साठी संपर्क: +91 95940 20718सदस्यता नोंदणीसाठी आजच अर्ज कराश्री. बाबाजी इंदोरे — नवी मुंबई महानगरपालिका उपमहापौर — जनतेच्या सेवेत सदैव तत्परतक्रार / सूचना साठी संपर्क: +91 95940 20718सदस्यता नोंदणीसाठी आजच अर्ज करा
👤

परिचय

श्री. बाबाजी इंदोरे
🪷 शिवसेना
👤 संपूर्ण परिचय

श्री. बाबाजी इंदोरे

शिवसेना विभाग प्रमुख, सानपाडा
📍 बेलापूर, सानपाडा, नवी मुंबई

आयुष्यात पहिल्यापासूनच काहीतरी वेगळे करण्याची आणि समाजहितासाठी स्वतःला झोकून देण्याची जिद्ध माझ्या मनामध्ये होती. आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील ‘चांडोली खुर्द’ या छोट्याशा गावात १३ डिसेंबर १९८५ रोजी एका सर्वसामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. कुटुंबाला पहिल्यापासूनच नीतिमत्तेचा आणि कष्टाचा वारसा असल्यामुळे निस्वार्थपणे समाजासाठी काम करण्याची गोडी मला उपजतच लागली.

माझे माध्यमिक शिक्षण पूर्ण करून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आणि प्रगतीची नवी शिखरे सर करण्यासाठी मी नवी मुंबईत आलो. सुरुवातीच्या काळात कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलताना मी सप्लाय चेन मॅनेजमेंटमधील पदविका पूर्ण केली आणि फ्रेट फॉरवर्डिंग व ट्रान्सपोर्ट क्षेत्रात व्यवसायाला सुरुवात केली. व्यवसाय करत असताना अनेक चढ-उतार आले, परंतु या अडचणींना धैर्याने तोंड देण्याची जिद्द माझे वडील श्री. महादेव इंदोरे आणि माझ्या सहकाऱ्यांनी माझ्यात निर्माण केली. मी व्यवसाय करत असतानाच… सानपाडा परिसरातील नागरिकांच्या समस्या जवळून अनुभवल्या. केवळ स्वतःची प्रगती न साधता समाजाचे देणे लागते, या भावनेतून मी शिवसेना पक्षात सक्रिय झालो. २००८ साली ‘गटप्रमुख’ म्हणून सुरू झालेला हा प्रवास आज ‘विभागप्रमुख’ पदापर्यंत येऊन पोहोचला आहे.

जनसेवा हाच धर्म: शिवसेनेच्या ‘८०% समाजकारण आणि २०% राजकारण’ या विचाराने प्रेरित होऊन मी आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक सुविधांच्या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली.

आरोग्य शिबिरे: दरवर्षी भव्य आरोग्य शिबिरे आणि महिलांसाठी विशेष कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन करून हजारो नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

विकासकामांचा ध्यास: सानपाडा परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांसाठी मी नेहमीच महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे.

माझा प्रभाग, माझी जबाबदारी: कोविडच्या कठीण काळात असो वा नियमित कामात, प्रभागातील प्रत्येक नागरिकाला आपले मानून मी मदतीचा हात दिला आहे.

आजवर मी कुठल्याही स्वार्थाशिवाय सामान्य जनतेसाठी कार्य करत आलोय. आता ध्यास घेतला आहे आपल्या शहराच्या सर्वांगीण प्रगतीचा. हे लोकसेवेचे व्रत असेच अविरत चालू राहावे, यासाठी मला आपल्या आशीर्वादाची आणि खंबीर साथीची गरज आहे.

आपला नम्र,

बाबाजी महादेव इंदोरे

विभागप्रमुख, शिवसेना

🗓️
जन्मतारीख
1985-12-13
📍
जन्मठिकाण
आंबेगाव, पुणे
🎓
शिक्षण
DLSCM (Diploma in Logistics and Supply Chain Management), HSC
🏛️
मतदारसंघ
बेलापूर, सानपाडा, नवी मुंबई
"प्रत्येक पाऊल जनतेच्या सेवेसाठी"